Pune News : पुणे : हजरत निजामुद्दिन ते वास्को गोवा एक्सप्रेसच्या कोचरचनेत बदल करण्यात येणार आहे. १६ जूनपासून हा बदल अमलात येईल. प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पुणे येथील मध्यरेल्वेचे जनसंपर्काधिकारी रामपाल बडपग्गा यांनी कळविले आहे.
या एक्सप्रेसची सध्याची कोचरचना अशी आहे. एसी फर्स्ट-०१, एसी टू टियर-०२, एसी थ्री टियर-०४, एसी थ्री टियर इकॉनॉमी-०४, स्लीपर-०२, गार्ड आणि जनरेटर ब्रेक व्हॅन-०४, एसी पँट्री कार-०१, उच्च क्षमता पार्सल व्हॅनसह सामान्य द्वितीय श्रेणी – ०२ = एकूण २० डबे
नवीन सुधारित कोचरचना अशी असेल. एसी फर्स्ट-०१, एसी टू टियर-०१, एसी थ्री टियर-०१, एसी थ्री टियर इकॉनॉमी-०२, स्लीपर-०६, गार्ड आणि जनरेटर ब्रेक व्हॅनसह सामान्य द्वितीय श्रेणी-०६, एसी पँट्री कार-०१, उच्च क्षमता पार्सल व्हॅन -०२ = एकूण २० डबे
प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
Discussion about this post