व्हीएसआरएस न्युज पिंपरी भारत सरकार मान्यताप्राप्त स्पर्धेचे हिमाचल प्रदेश येथे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत २६ राज्यातील एकूण १५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करुन २८ पैकी २५ पदके जिंकली आणि महाराष्ट्र राज्यासोबत, पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पाडली आहे.
कुडो सारख्या स्वतः चे रक्षण व सरकारी नोकरीत आरक्षण अश्या खेळांमध्ये विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे असे त्यांनी जनतेस आवाहन केले.
तसेच कुडो प्रशिक्षक म्हणून मा. अरविंद मोरे (अध्यक्ष – पुणे जिल्हा कुडो संघटना) मा. सुहास धाईंजे (अध्यक्ष -पुणे ग्रामीण कुडो संघटना), मा. राहुल पवार (सचिव – पिंपरी चिंचवड कुडो संघटना) मा. शीतल मोरे (सचिव – पुणे जिल्हा निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया) यांचा पिंपरी चिंचवड महानगर पालिका मार्फत सन्मान करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने राष्ट्रीय कुडो मिक्स मार्शल आर्ट खेळाडूंचा त्यांच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापौर कक्षात झालेल्या या कार्यक्रमास जैवविविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उपा मुंढे उपस्थित होत्या.
विजयी विद्यार्थी
सुवर्णपदक गार्गी मोरे, – मृण्मयी काळोखे, भक्ती हगवणे, पीयूष मेश्राम, अंजली सपाटे, क्षितिज धनवे, सिद्धार्थ चव्हाण
■ रौप्यपदक प्रतीक चासकर, सानिका सगर, पृथ्वीराज इंगळे, सुहास घाईजे, हरमेहर कटारिया, खेणन पाटील, खुशी वाघचौरे
■कांस्य पदक प्रथमेश भोंडवे, आर्यन पवार, आर्या पवार, चाहत पठाण, आर्यन हगवणे, शिवम विघ्ने, धनश्री कोळी, समृद्धी खंदारे, श्लोक दीक्षित, तेजस सुर्वे, जयवंत समल
Discussion about this post