व्हीएसआरएस मराठी न्युज –आयपीएल 2023 चे विजेतेपद आज कोण पटकावणार याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे. गतविजेते गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज अंतिम सामना होणार आहे.
गुजरात टायटन्स सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी मैदानात उतरेल तर चेन्नई सुपर किंग्ज पाचव्यांदा जिंकून मुंबई इंडियन्ससोबत बरोबरी करण्याच्या इराद्याने लढेल. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. आतापर्यंत मुंबईने पाच वेळा विजेतेपद पटकावलं असून धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 4 वेळा आयपीएल जिंकलं आहे. चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सला हरवल्यास ते मुंबईशी बरोबरी करतील.
कुणाला किती रक्कम मिळणार?
• विजेती टीम- 20 कोटी रुपये
• उप-विजेता संघ- 13 कोटी रुपये
• तिसऱ्या क्रमांकावरील संघ (मुंबई इंडियन्स)- 7 कोटी रुपये
• चौथ्या क्रमांकावरील संघ (लखनऊ सुपर जायंट्स)- 6.5 कोटी रुपये
• एमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट- 20 लाख रुपये
• सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन- 15 लाख रुपये
• ऑरेंज कॅप- 15 लाख रुपये (सर्वाधिक धावा)
• पर्पल कॅप- 15 लाख रुपये (सर्वाधिक विकेट)
• मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर ऑफ द सीजन- 12 लाख रुपये
• सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम- 12 लाख रुपये
• गेम चेंजर ऑफ द सीजन- 12 लाख रुपये
आयपीएल 2023मध्ये प्लेऑफसह एकूण 74 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 70 मॅच लीग स्टेज होत्या. त्यात 18 डबल हेडरचा सहभाग होता. यावेळी गुवाहाटी आणि धर्मशाळेलाही मॅच आयोजित करण्याची संधी मिळाली. धर्मशाळा ही पंजाब किंग्स आणि गुवाहाटी हे राजस्थान रॉयल्सचं होमग्राऊंड होतं. याशिवाय अहमदाबाद, मोहाली, लखनऊ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर आणि मुंबईतही सामने खेळवले गेले.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा
• शुभमन गिल (गुजरात टायटन्स)- 851 धावा
• फाफ डु प्लेसिस (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)- 730 धावा
• विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)- 639 धावा
• डेवोन कॉन्वे (चेन्नई सुपर किंग्स)- 625 धावा
• यशस्वी जायसवाल (चेन्नई सुपर किंग्स)- 625 धावा
आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक बळी
• मोहम्मद शमी (गुजरात टायटन्स)- 28 विकेट
• राशिद खान (गुजरात टायटन्स)- 27 विकेट
• मोहित शर्मा (गुजरात टायटन्स)- 24 विकेट
• पीयूष चावला (मुंबई इंडियन्स)- 22 विकेट
• युजवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स)- 21 विकेट
Discussion about this post