व्हीएसआरएस मराठी न्युज -भारताची 17 वर्षीय कुस्तीपटू अंतिम पंघलनं इतिहास रचला. बुल्गारियाच्या सोफिया येथील 20 वर्षांखालील कुस्ती जागतिक स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. 53 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या अॅटलिन शागायेवाचा 8-0 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. तसेच 20 वर्षांखालील कुस्ती जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली.
2004 सालची ही गोष्ट असून रामनिवास पंघाल आणि कृष्णा कुमारी चौथ्यांदा एका मुलीचे माता-पिता बनले. त्यांनी आपल्या मुलीच नाव अंतिम ठेवलं. याचा अर्थ फायनल किंवा शेवट होतो. पण अंतिमला अंतिम बनायच नव्हतं. वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये तिने कमाल केली. ‘अंतिम’ अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियन बनणारी पहिली महिला कुस्तीपटू बनली आहे.
अंतिमने ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये फक्त गोल्ड मेडलच मिळवलं नाही, तर 53 किलो वजनी गटात तिने वर्चस्व गाजवलं. तिने युरोपियन चॅम्पियन ओलिविया एंडरिचवर टेक्निकल सुपरियोरिटीने विजय मिळवला. एका मिनिटात जापानच्या अयाका किमुराला हरवलं. युक्रेनची नताली क्लिवचुत्सका अशी एकमेव कुस्तीपटू होती, जिने पूर्ण 6 मिनिट अंतिमला लढत दिली. पण अंतिमने तिच्या विरुद्धही विजय मिळवला. फायनल मध्ये तिने कजाकिस्तानच्या अल्टिन शगायेवाला 8-0 ने हरवून इतिहास रचला.
विशेष म्हणजे अंतिमनं यापूर्वी कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप (2021) मध्ये कांस्य आणि आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप (2022) मध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. तिनं यावर्षी अंडर 23 आशियाई चॅम्पियनशिपमध्येही रौप्यपदक जिंकलं होते.20 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतानं 12 पदक मिळवली आहेत.
Discussion about this post