व्हीएसआरएस मराठी न्युज –माेताळा – दि १ सप्टेंबर २२ (गुरुवार) :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव तथा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धनदादा सपकाळ यांचा वाढदिवस काल माेठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा झाला.
माेताळा, पिंपरी गवळी, पिंपळगाव देवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबीर आणि रुग्णांना फळवाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागात सुध्दा सपकाळ यांच्या समर्थकांच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हर्षवर्धनदादा सपकाळ हे जिल्ह्यात एक लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे दरवर्षी सपकाळ यांचा वाढदिवस माेठ्या उत्साहात साजरा हाेत असताे. पक्षसंघटेनेची जबाबदारी असल्यामुळे हर्षवर्धनदादा सपकाळ हे हिमाचल प्रदेशला आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी मृणालिनीताई सपकाळ व मुलगी डाँ. गार्गी सपकाळ यांनी कार्यक्रर्मांना हजेरी लावली. तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींनी, कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी या कार्यक्रमात सहभागी हाेवुन सपकाळ यांचा वाढदिवस माेठ्या उत्साहात साजरा केला.!
Discussion about this post