व्हीएसआरएस मराठी न्युज –भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. पहिले दोन सामने झाले असून त्यात दोन्ही संघ १-१ ने जिंकून मालिकेत बरोबरीवर आहेत.
टीम इंडियाने मुंबईत विजय मिळविला तर ऑस्ट्रेलियाने विशाखापट्टणममध्ये जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने आता चेन्नई वन डेत बुधवारी मालिका विजेत्याचा निर्णय होईल.
हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ जिवाची बाजी लावणार हे निश्चित. सामन्याचा निकाल मालिकेतील विजेता ठरवेल शिवाय आयसीसीचा नंबर वन संघदेखील या सामन्याद्वारे निश्चित होणार आहे.
आता तिसरा आणि निर्णायक सामना 22 मार्चला होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दुपारी 1.30 पासून खेळवला जाईल.
Discussion about this post