Bihar News : बिहार : बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील दानापूर येथील एका शिवमंदिराचा पुजारी गेले सहा दिवस बेपत्ता होता. अखेर दि. १६ डिसेंबर रोजी त्याचा मृतदेह सापडला असून त्याची हत्या झाली असल्याचे दिसून येत आहे.
मनोज कुमार (वय २२) असे या पुजार्याचे नाव आहे. तो भाजपच्या माजी विभागीय अध्यक्षाचा भाऊ होता. गेले सहा दिवस तो बेपत्ता होता. शनिवारी त्याचा मृतदेह गावातील झुडुपात सापडला.त्यावर गोळ्या झाडल्याच्या खुणा आहेत. दोन्ही डोळे काढण्यात आले असून गुप्तांगही कापण्यात आले आहे.
या निर्घृण हत्येमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत राष्ट्रीय महामार्ग २७ रोखून धरला. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आहे.
या प्रकरणावरून भाजपचे प्रवक्ता शेहजाद पूनावाला यांनी बिहार सरकारवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. ‘बिहारमध्ये पुन्हा जंगलराज आले आहे.’ अशा शब्दात त्यांनी एक्सवर बिहार सरकारवर टीका केली आहे.
Discussion about this post