Maharashtra : नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील स्फोटके निर्माण करणार्या सोलर एक्सप्लोझिव्ह या कंपनीत झालेल्या स्फोटात झालेल्या कामगारांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस व संबंधित सर्व यंत्रणांना मदत व अनुषंगाने निर्देश दिले आहेत. या घटनेतील जखमींना वेळेत व दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.
Discussion about this post