व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
याबाबतचे सुधारित आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि.६) दिले आहेत.
या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते संध्याकाळी सहा यावेळेत पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करणेत येत आहे. वैद्यकीय व इतर जीवनावश्यक सेवांना सूट देण्यात आलेली असुन त्यांचे वाहतुकीला निबंध असणार नाहीत. आठवड्यातील सर्व दिवशी सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने, क्रिडांगणे बंद राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा आणि मॉल्स दिवसभर बंद राहतील. तसेच अत्यावश्यक दुकानाचे परिसरात ग्राहकांमधील सामाजिक अंतर राखणे बंधनकारक राहील. जीवनावश्यक वस्तू दुकानांचे मालक आणि सर्व दुकानांवर काम करणाऱ्या व्यक्तींनी लवकरात लवकर लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
सार्वजनिक वाहतूक कार्यान्वित राहणार असली तरी रिक्षामध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीत चालक व वाहनाच्या ५०% क्षमेते एवढे प्रवासी तर बसमध्ये आरटीओने मान्य केलेली आसन क्षमतेनुसार परवानगी असेल. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या सर्व व्यक्तींनी योग्य प्रकारे मास्क परीधान करणे आवश्यक राहील, योग्य प्रकारे मास्क परीधान न केल्यास रक्कम रुपये पाचशे रुपये दंड आकारुन वसुल केला जाईल.