व्हीएसआरएस न्युज पिंपरी- वारकऱ्यांचे किर्तनाच्या शैलीतील चौकार-षटकार आपण पाहिले असतील पण क्रिकेटच्या मैदानावरील चौकार-षटकार पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
ही स्पर्धा दिनांक 8 व 9 मे रोजी, ए. के. स्पोर्टस्, साळुंब्रे, मावळ, पुणे येथे संपन्न होणार आहे. या मध्यामातून वारकरी संप्रदाय एकत्र येत, राज्याला एक सामाजिक संदेश ही देणार आहेत.
या क्रिकेट लिग मध्ये एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत. त्यामध्ये गट-अ आणि गट-ब संघात सामने होणार आहे. यात सिंहगड सुभेदार, राजगड लायन्स, तोरणा सम्राट, किंग्ज इलेव्हन सज्जनगड, पन्हाळ गड योध्दा, अजिंक्य जंजिरा फायटर्स, पुरंदर वॉरियर्स, शिवनेरी टायगर्स, प्रतापगड योध्दा आणि लोहगड मावळ असणार आहेत.
या क्रिकेट स्पर्धेची वैशिष्ट्ये म्हणजे फुल स्पीच टेनिस क्रिकेट स्पर्धा असणार, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, कथाकार, गायक, वादक आणि वारकरी अशा एकूण 150 वारकऱ्यांचा खेळाडू म्हणून सहभाग असणार आहे. संपूर्ण स्पर्धकांसाठी पाच लाखांची पारितोषिके असणार आहेत. सर्व वारकरी खेळाडू हे क्रिकेट पोशाखात मैदानात उतरतील, स्पर्धा यशस्वी झाल्यानंतर विश्वविक्रमात नोंद करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.