व्हीएसआरएस न्युज -पिपंरी-चिंचवड
महापालिकेत भेटवस्तू घेऊन येण्या-यास सुरक्षा विभागाने मज्जाव करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.
महापालिकेमध्ये विविध क्षेत्रांतील नागरिक येत असतात. कामानिमित्त विविध विभागातील अधिकाऱ्यांचा नागरिकांशी संपर्क येतो. त्यामुळे आपले हितसंबंध जोपासण्यासाठी, प्रेमापोटी, किंवा सणाचे औचित्य साधून नागरिक अधिकाऱ्यांना भेटवस्तू देत असतात.
बांधकाम परवाना, लेखा स्थापत्य विभाग, पाणीपुरवठा विभागांमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध भेटवस्तू येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. परंतु, भेटवस्तू स्वीकारणे लोकाभिमुख प्रशासनासाठी बाधक आहे.
नागरिक, ठेकेदार, अन्य कोणत्याही व्यक्ती, अथवा कोणत्याही संस्थाकडून देणग्या, भेटवस्तू स्वीकारु नये. महापालिकेतील कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या कुटुंबीयांतील व्यक्ती, त्याच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीला भेट वस्तू स्वीकारण्याची परवानगी देवू नये.
अशा प्रकारची भेटवस्तू , देणगी स्वीकारल्याचे आढळून आल्यास संबंधितावर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्याचा इशारा आयुक्त हर्डीकर यांनी परिपत्रकाद्वारे दिला आहे.