व्हीएसआरएस न्युज स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंढे प्रतिष्ठांनच्या वतीने संत भगवानबाबा व वैराग्यमुर्ती वामनभाऊ यांची
संयुक्त पुण्यतिथी विविध धार्मिक उपक्रमांनी ज्ञानज्योत सभागृहात साजरी करण्यात आली.
यावेळी पंडित महाराज नागरगोजे, प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी संत भगवानबाबा व वैराग्यमुर्ती वामनभाऊ यांचे जिवन कार्यावर आधारित मार्गदर्शन करीत त्यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्श असल्याचे सांगत सर्वांनी त्यांचे मार्गदर्शक कार्याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. यावेळी समाज बांधवांचे वतीने हरिपाठ वाचन, प्रवचन सेवा, सत्संग आरती, पसायदान झाले.
या प्रसंगी काशीनाथ गिते, विधीतज्ञ सदाशिव आघव, शिक्षण मंडळाचे सदस्य अविनाश बोरुंदिया, विलास सांगळे, गजानन नागरे,भिकाजीराव घुले , विशाल सांगळे, गोरख महाराज नागरगोजे, बाबा सांगळे, हिरामन पगडे, मंडूबाबा पालवे, किसनराव पालवे, राजू दराडे, दत्ताभाऊ खालापुरे, भाऊसाहेब देवरे,अनिल बोडखे, प्रभाकर काकडे, किरण पालवे, नितीन सांगळे, आदित्य सांगळे यांचेसह समाज बांधव,महिला उपस्थित होते. स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंढे प्रतिष्ठान ने कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
यावेळी प्रास्ताविक अविनाश बोरुंदिया यांनी केले. सूत्रसंचालन सदाशिव आघव यांनी केले. आभार काशीनाथ गिते यांनी मानले.