व्हीएसआरएस न्युज पिंपरी- कार्यसम्राट आमदार माननीय लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव याचे आयोजन योगदान प्रतिष्ठान चिंचवड व प्रभाग सभापती नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या वतीने पुणे जिल्हा मर्यादित आमंत्रित कॅरम स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचा उद्घाटन समारंभ आज दि 13 फेब्रुवारी रोजी चिंचवड येथे संपन्न झाला.
पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रथम नागरिक महापौर उषा उर्फ माई ढोरे तसेच माननीय नगरसेवक शंकर शेठ जगताप पक्षनेते नामदेव ढाके जयवंत उर्फ आप्पा बागल यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला .
यावेळी प्रभागातील नगरसेवक राजेंद्र गावडे मोरेश्वर शेडगे स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे गजानन दशरथ चिंचवडे महिला अध्यक्षा उज्ज्वला गावडे उपस्थित होत्या
१६८ स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे सदर स्पर्धा १३ व १४ फेब्रुवारी सकाळी साडेनऊ ते पाच वाजेपर्यंत शिवाजी रामभाऊ भोईर सांस्कृतिक सभागृह चिंचवडगाव येथे सुरू राहील या कार्यक्रमाचे आयोजन शैलेश उर्फ आबा गावडे अविनाश कदम सहकार्यांनी केले.