व्हीएसआरएस न्युज -पिपंरी-चिंचवड पिंपरी-चिंचवडमधील आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप या भाजपच्या दोन्ही आमदारांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तोंड भरून कौतुक केले. तसेच, त्यांनी राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले असून लांडगे-जगताप यांना हरविणे सोपे नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले आहे.
चालू पंचवार्षिकच्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विजयाला आज (दि. २४ ऑक्टोबर ) एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आमदार लांडगे आणि आमदार जगताप यांचा पिंपळे सौदागर येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवि अनासपुरे, महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस राजू दुर्गे, प्रदेश सचिव अमित गोरखे, प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, प्रदेश सदस्य एकनाथ पवार, प्रदेश सदस्य राजेश पिल्ले, महिला अध्यक्षा उज्वला गावडे आदी उपस्थित होते.