व्हीएसआरएस न्युज -डॉ. डी वाय पाटील आयुर्वेद रुग्णालय पिंपरी , पुणे येथे दि. २० नोव्हेंबर २०२० ( शुक्रवार ) रोजी ‘जागतिक मूळव्याध दिन ‘ साजरा करण्यात येणार आहे . या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दि. २० नोव्हे. २०२० ते २५ नोव्हे. २०२० पर्यत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . मूळव्याध, फिशर , भगंदर असणाऱ्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा . शिबिराची वेळ स. ९ ते दु. ४ असेल , शल्यतंत्र विभागाच्या वतीने मूळव्याध , फिशर , भगंदर मोफत चिकित्सा व मार्गदर्शन केले जाईल शिबिरांनंतरही सदर सेवा उपलब्ध राहील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.