व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
दिलेल्या निवेदनात नगरसेविका म्हणतात ,पिं. चि.मनपा ने दिलेल्या जाहिरातीनुसार अनेक शिक्षक उमेदवारांनी आपल्याकडे नोकरीसाठी ऑफलाईन अर्ज सादर केलेले आहेत.
या उमेदवारांची निवड करताना आपण पिंपरी-चिंचवड शहर व पुणे शहरातील उमेदवारांची नियुक्ती करावी यासाठी हा प्रस्ताव आपल्याकडे सादर करीत आहे.
पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याकडे नोकरीसाठी अर्ज आले आहेत आणि प्रथम स्थानिक-करदाते शिक्षक उमेदवारांना प्राधान्य देणे गरजेचे आहे असे मला वाटते.
त्याचप्रमाणे ही नियुक्ती फक्त सहा महिन्यांची असून बाहेरून येणाऱ्या उमेदवारास येण्या-जाण्याचा खर्च किंवा येथे राहण्याचा खर्च यामध्येच त्यांचा पगार निघून जाणार आहे .
तरी या वरील बाबी लक्षात घेऊन आपण पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे अशी मागणी नगरसेविका सौ प्रियांका बारसे यांनी ई मेलद्वारे केली आहे.
2020 -21 या शैक्षणिक वर्षात एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची नेमणूक करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या,अशी मागणी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.