व्हीएसआरएस न्युज -पिपंरी-
पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स -पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 127 आणि पालिका हद्दीबाहेरील 17 अशा 144 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 87 हजार 51 झाली असून, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 165 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील 8 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 2 अशी 10 रुग्णांचा आज मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्या हे ०५ पुरुष – चिखली (८० वर्षे), आकुर्डी (७३ वर्षे), पिंपळे गुरव (६० वर्षे), निगडी (७० वर्षे), चिंचवड (५७ वर्षे) ०३ स्त्री- मोशी (६२ वर्षे, ७६ वर्षे), कासारवाडी (८५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – लोणावळा (५५ वर्षे), वाघोली (६० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिम (दुसरा टप्पा) अंतर्गत आज अखेर १३१४ पथकांव्दारे २०५५५७० लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये ४९६७ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता १७१ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.
शहरातील 1519 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या 627 अशा 2146 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1049 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 993 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.