व्हीएसआरएस न्युज पिंपरी- मराठी पत्रकार परिषदेच्या 82 व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने आज सकाळी 9.30 वाजता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले.
शिबिराचे उदघाटन मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांची तपासणी करून करण्यात आले यावेळी पिपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे,तालेरा रुग्णालयाचे प्रमुख डॉ सुनील जॉन,डॉ राजेंद्र फिरके पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडगुले,उपाध्यक्ष प्रवीण शिर्के,सहकोषाध्यक्ष माधुरी कोराड,अनिल भालेराव,सदस्य सीताराम मोरे,सूरज साळवे इत्यादी उपस्थित होते