व्हीएसआरएस न्युज पिंपरी- शहरातील पाच आणि पालिका हद्दीबाहेरील दोन रुग्णांचा आज मृत्यू झाला. त्यामध्ये कासारवाडीतील 56 वर्षीय पुरुष, मोहननगर येथील 48 वर्षीय पुरुष, वाल्हेकरवाडीतील 44 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, भोसरीतील 80 वर्षीय वृद्ध महिला आणि जुन्नर येथील 67 वर्षीय पुरुष, साता-यातील 78 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
शहरात आजपर्यंत 91 हजार 284 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 87 हजार 549 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1601 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या 664 अशा 2265 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या 807 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1259 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 91 हजार 284 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 88 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.