व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स
पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 124 आणि पालिका हद्दीबाहेरील 1 अशा 125 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 86 हजार 924 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 191 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.शहरातील 2 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 3 अशा 5 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.
मृत्यू झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – चिखली (६५ वर्षे), ०१ स्त्री- रावेत (६८ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – मुळशी (४९ वर्षे), जुन्नर (५७ वर्षे) ०१ स्त्री- खेड (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिम (दुसरा टप्पा) अंतर्गत आज अखेर १३१४ पथकांव्दारे २०४८९८५ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये ४९६६ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता १७० व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.