व्हीएसआरएस न्युज पिंपरी- शहरातील दोन आणि महापालिका हद्दीबाहेरील एक अशा तीन जणांचा आज मृत्यू झाला.
त्यात पिंपरीतील 73 वर्षीय महिला, रहाटणीतील 58 वर्षीय महिला आणि जुन्नर येथील 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला.
शहरात आजपर्यंत 97 हजार 175 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 93 हजार 738 जण बरे होऊन घरी गेले. शहरातील 1764 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या 735 अशा 2499 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.
सध्या 693 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 2327 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 97 हजार 175 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 71 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.