व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 204 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद.
शहरातील दिघीतील एका 70 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात आजपर्यंत 1 लाख 3625 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 98 हजार 613 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
शहरातील 1832 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 772 अशा 2604 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या 842 सक्रीय रुग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 328 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 19 हजार 821 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 735 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.
‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 39 नवीन रुग्ण सापडले आहेत. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 251 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.