व्हीएसआरएस न्युज -पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 146 आणि पालिका हद्दीबाहेरील 20 अशा 166 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – जुन्नर (६७ वर्षे, ६७ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
शहरात आजपर्यंत 87 हजार 740 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 84 हजार 478 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1527 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या 632 अशा 2159 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या 859 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1269 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 87 हजार 740 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 232 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.