व्हीएसआरएस न्युज पिंपरी-पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयुक्तालय हद्दीत विकेंड लॉकडाऊनचा आढावा घेतला.
शनिवारी मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश त्यांच्या अनोख्या अंदाजात सायकलवरून गस्तीसाठी निघाले.
त्यांनी तळेगाव दाभाडे आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भेट दिली. तसेच तळेगाव शहर परिसरात गस्तीवर असलेल्या पोलीस आणि ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांसोबत त्यांनी चर्चा केली. त्यांना मार्गदर्शन करून आयुक्त सायकलवरून चाकणच्या दिशेने रवाना झाले.
पोलीस वर्दीऐवजी ट्रॅकसूट मध्ये मध्यरात्री चक्क सायकलवरून आलेल्या पोलीस आयुक्तांना पाहून पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.