व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका क्रीडा विभागाचे क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण महामंडळाकडून यावर्षीचा स्व. बाबू निमल ऑलम्पियन जीवन गौरव पुरस्कार जाहीरकरण्यात आला.
यापुरस्काराचे वितरण २६ जानेवारीला आचार्य अत्रे सभागृह, वल्लभनगर, पिंपरी येथे करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे संचालक निवृत्ती काळभोर यांनी दिली आहे. पानसरे हे मनपामध्ये गेल्या ३२ वर्षापासून कार्यरत आहेत. बॉक्सिंग क्रीडा प्रकारात त्यांनी वेस्टर्न इंडिया चँपीयन (सुवर्ण), ऑल इंडिया (सुवर्ण), १९७७, ७८ बेस्ट बॉक्सर ऑल इंडिया, दोन वेळा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चपीयन, ५५० लढतीत अर्जिक्य, एन.आय.एस. प्रशिक्षक, ७वेळा राष्ट्रीय प्रशिक्षक, छत्रपती पुरस्कार प्राप्त विजय यादव, राष्ट्रीय स्तरावर विजेते झालेले १५ खेळाडू घडविण्यात हातभार लावल्याने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती काळभोर यांनी दिली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त वल्लभनगर येथील आचार्य अत्रे सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी-मुख्याध्यापक विशेष पुरस्कार : डॉ. अर्पिता व्होरा, शुभांगी इथापे, चंद्रशेखर कदम, क्रीडा पत्रकार : रोहित खरगे, गुणवंत क्रीडा शिक्षक : मनीषा जाधव, शबाना अब्दुल शेख, ज्ञानेश्वरी लोखंडे, सुलोचना चौधरी, सुधा ढवळे, ऋक्मिणी महिला विशेष क्रीडा पुरस्कार : अंजली दळवी, क्रीडा पर्यवेक्षक पुरस्कार : आशा ढवळे, ज्ञानेश्वर भिसे, क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार: ताराचंद कलापुरे-कुस्ती, मनोज काळे- जिम्नॅस्टिक, क्रीडा संघटक पुरस्कार : किशोर शिंदे, अरविंद मोरे.यांना जाहीर झाला आहे.