व्हीएसआरएस न्युज खेड-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व रस्ते साधन सुविधा आस्थपणाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष योगेश परुळेकर व सरचिटणीस योगेश चिले यांच्या मार्गदर्शनाने खेड तालुका (रस्ते साधन सुविधा आस्थपणा) अध्यक्षपदी प्रसाद सुभाषराव बोराटे यांची नियुक्ती करण्यात आली.
हेमंत संभुस (सरचिटणीस महाराष्ट्र राज्य व प्रवक्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना) व पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भांडवलकर तसेच जिल्हाउपाध्यक्ष अविनाश लोखंडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी उपस्थित आळंदी शहर अध्यक्ष तुषार (बाळू) नेटके, शिरूर तालुका रस्ते साधन सुविधा आस्थपणा अध्यक्ष सुदाम चव्हाण, शिरूर तालुका कामगार सेना अध्यक्ष रवी गुलाडे, खेड तालुका उपाध्यक्ष युवराज चौधरी, शहराध्यक्ष निलेश घुंडरे, उपाध्यक्ष किरण नरके व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.