व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
पिंपरी-चिंचवड महापालिका
नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत, महिला बालकल्याण, मागासवर्गीय, अपंग कल्याणकारी व इतर योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनांसाठी अर्ज वाटप 27 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत होणार आहे. अर्ज वाटप आणि स्वीकृती पालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रात सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राहील. अर्ज मोफत मिळतील. अर्ज स्वीकृतीवेळी 20 रुपये शुल्क आकारण्यात येईल.
महिला बालकल्याण अंतर्गत !
-विधवा व घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य
-इयत्ता दहावी मधील मुलींना शैक्षणिक साहित्य घेणेकामी अर्थसहाय्य.
-दहावी नंतरचे (आयटीआय मधील) मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदाविका अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य.
-दीड वर्षे पूर्ण झालेल्या बचतगटास अर्थसहाय्य मुलगी दत्तक घेणा-या दांपत्यास अर्थसहाय्य अस्तित्व पुनर्वसन योजना.
-पहिल्या मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणा-या अथवा पहिली मुलगी असताना दुसरी मुलगी झाल्यास दुस-या मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणा-या महिलेस अर्थसहाय्य. अर्थसाह्य
-रामभाऊ म्हाळगी -मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी अर्थसाह्य
-परदेशातील उच्चशिक्षण/अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या युवतींना अर्थसहाय्य
-दहा वर्ष पूर्ण झालेल्या महिला बचतगटांना अर्थसहाय्य देणे
-बारावी नंतरचे वैद्यकीय (MBBS, BAMS, BHMS, BDS , BUMS) MBA आणि अभियंत्रिकी पदवी परिक्षा यासारखे उच्च शिक्षण घेणा-या युवंतीना अर्थसहाय्य
मागासवर्गीय कल्याणकारी योजना!
-पाचवी ते दहावी मध्ये शिकणारे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती
– बारावी नंतरचे वैद्यकीय (MBBS, BAMS, BHMS, BDS , BUMS) MBA आणि
-अभियंत्रिकी पदवी परिक्षा यासारखे उच्च शिक्षण
घेणा-या मागासवर्गीय विद्यार्थांना अर्थसहाय्य मागासवर्गीय युवकांना परदेशातील
उच्चशिक्षणासाठी अर्थसहाय्य
अपंग कल्याणकारी योजना!
-अपंग उपयुक्त साधने
-अंध, अस्थिव्यंग, कर्णबधीर विद्यार्थ्यांना बारावी नंतरचे वैद्यकीय (MBBS, BAMS, BHMS, BDS , BUMS) MBA आणि अभियांत्रिकी पदवी परिक्षा यासारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य
-विशेष (मतिमंद) व्यक्तींचा संभाळ करणा-या संस्थेस /पालकांस अर्थसहाय्य
संत गाडगे महाराज -दिव्यांग व अव्यंग जोडप्याना विवाहासाठी प्रोसाहनपर अर्थसहाय्य देणे
पंडित दीनदयाल उपाध्याय इयत्ता पहिली ते पदव्यूत्तर पर्यंत शिक्षण घेणाऱ्या महापालिका हद्दीतील अनाथ /निराधार विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पंडित दीनदयाल उपाध्याय दिव्यांग (अपंग) कल्याणकारी (अर्थसहाय्य) योजना
इतर कल्याणकारी योजना!
-इयत्ता दहावी मधील 80% ते 90% गुण
मिळवणारे विद्यार्थी
-इयत्ता दहावी मधील 90% च्या वर गुण
मिळवणारे विद्यार्थी
-इयत्ता बारावी मधील 80% च्या वरील गुण
मिळवणारे विद्यार्थी
-एच.आय.व्ही. / एड्स बाधित मुलांचा सांभाळ करणा-या पालकांना / संस्थांना अर्थसहाय्य
योजनांसाठी अर्ज वाटप 27 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत होणार आहे. अर्ज वाटप आणि स्वीकृती पालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रात सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राहील. अर्ज मोफत मिळतील. अर्ज स्वीकृतीवेळी 20 रुपये शुल्क आकारण्यात येईल.