व्हीएसआरएस न्युज वाकड येथे रिक्षा चालक मालकांचा मेळावा आणि रिक्षा स्टँड चे उद्घाटन.
पिंपरी-चिंचवड शहर नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले असून स्मार्ट सिटी योजनेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला आहे, अशातच पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी शहरातील गुन्हेगारी बेकायदेशीर धंदे याबाबत मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करून पोलिसांबद्दल आदरयुक्त धाक निर्माण केला आहे यामुळे पोलिस प्रशासन आणि कायद्याबद्दल आदर निर्माण झाला असून शहर सुरळीत होत असताना शहरांमध्ये मीटरने रिक्षा सुरू व्हाव्यात अशी मागणी प्रशासनाने वतीने आयुक्त कृष्ण प्रकाश , उपयुक्त सुधिर हिरेमठ , सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत दिसले यांनी बैठक घेऊन केले आहे,
या बाबत आम्ही होकार दिला असून पिंपरी-चिंचवड शहरात मीटरने रिक्षा सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे परंतु रिक्षाचालकांचे इतर जे प्रश्न आहेत त्यामध्ये *नविन रिक्षा स्टँड ला मान्यता मिळणे, शेअर ए रिक्षा ने प्रवास , रिक्षाचालकांवर ऑनलाइन खटले* भरले जात असून याबद्दल ऑनलाईन खटले भरले जाऊ नये, बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई करावी ,मुक्त रिक्षा परवाना बंद करावा , रिक्षा चालक मालकांसाठी *कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे,फायनान्स कंपनीच्या, गुंडा कडून होणारे ,बेकायदेशीर वसुली, बाबत कारवाई करण्यात यावी, कोरोणा काळातील रिक्षा बंद म्हणून रिक्षाचालकांना आर्थिक सहकार्य मिळावे आदी विविध मागण्या रिक्षा चालक करत असून या मागण्यांवर आम्ही ठाम आहोत असे बाबा कांबळे म्हणाले.
यावेळी नगरसेवक आणि शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक मयूर कलाटे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष सोमनाथ कलाटे, रिक्षा ब्रिगेडचे बाळासाहेब ढवळे, महाराष्ट्र वाहतूक पंचायतचे सदाशिव तळेकर, सुरेंद्र जाधव, मोहन काटे, विजय ढगारे, संजय दौंडकर, धनंजय कुदळे, नवनाथ जोगदंड, भागवत मामा उजने, आदी उपस्थित होते.