व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधत अवैध संपत्ती बाळगला असल्याचा आरोप केला आहे. खासदार नवनीत राणा आणि मला शिवसेनेकडून टार्गेट केले जात आहे. मुख्यमंत्र्यांकडून तशी खिचडी शिजवली जात असल्याचा आरोपही राणा यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेगवेगळ्या देशात अवैध संपत्ती असून त्याची माहिती मी मिळवली आहे.
लवकरच ही माहिती ईडीकडे देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे आमदार राणा यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द केले होते. त्याविरोध खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालायाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना दिलासा मिळाला आहे. मात्र या प्रकरणात आता आनंदराव अडसूळ यांच्यावतीने अॅड. कपिल सिब्बल खासदार राणांविरोधात बाजू मांडणार आहेत.
यानंतर सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात काय निर्णय देणार किंवा आणखी पुढच्या तारखा मिळणार याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागून आहे. दरम्यान आमदार राणा यांनी मुख्यमंत्र्यांची परदेशात अवैध संपत्ती असल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप करत निशाना साधला त्यामुळे आता या कुरघोडीच्या राजकारणात वेगळेच वळण लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Discussion about this post