व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सुरक्षारक्षकांच्या ताफ्यात असलेले महेश तपाडे हे नाशिक येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार झाले.
महेश तपाडे यांच्या निधानामुळे, त्यांच्या सुरक्षारक्षक सहकाऱ्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी नवी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात जाऊन कोरोनासाठीची लस घेतली होती. यावेळी शरद पवारांसोबत त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यासुद्धा आल्या होत्या.
त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा जे.जे. रुग्णालयातच डॉ. तात्याराव लहाने यांच्या निरीक्षणाखाली कोरोनाची लस टोचून घेतली होती. यावेळीसुद्धा पवार यांच्यासोबत संपूर्ण सुरक्षापथक सोबत होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सुरक्षारक्षकांच्या ताफ्यात अनेक सुरक्षारक्षक तैनात आहेत. हे सुरक्षारक्षक दिवसरात्र आणि चोवीस तास आपलं कर्तव्य बजावत असतात. परंतु, या ताफ्यामध्ये असेही काही सुरक्षारक्षक आहेत, जे कायम पवार साहेबांच्या जवळ असतात. त्यांना पवार साहेबांचा अगदी जवळून सहवास लाभतो. अश्याच काही मोजक्या आणि विश्वासू सुरक्षारक्षकांपैकी एक असलेल्या पोलीस सुरक्षारक्षकाचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांचे नाव आहे महेश तपाडे. महेश तपाडे हे गेल्या बावीस वर्षांपासून शरद पवारांच्या सुरक्षेसाठी कायम सावलीप्रमाणे सोबत होते. शरद पवारांच्या प्रत्येक दौऱ्यात आणि प्रवासात महेश तपाडे हे कायम सोबत राहिले आहेत.