व्हीएसआरएस न्युज चिखली दि.२१ श्रीराम नवमीचे औचित्य साधून आज कार्यलय , चिखली, येथे बुधवार (दिनांक २१ एप्रिल) रामजन्मसोहळा संपन्न झाला.
कोरोनाच्या उद्रेकामुळे भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आली नाही; तसेच प्रसादाचे वाटप करण्यात आले नाही. श्री अंबिकालाल गुप्ता यांच्या हस्ते आरतीपूजन करण्यात आले.
सामूहिकपणे रामजन्माचा पाळणा सादर केला. कार्यक्रमाच्या आधी कार्यलय स्थळ निर्जंतुकीकरण केले. उपस्थित सर्वांनी मुखपट्टी लावून आणि सुरक्षित अंतर पाळून सहभाग घेतला.
विश्व श्रीराम सेना यांच्या वतिने आज अम्बुलंस लोकापर्ण करण्यात आले. त्या वेळी राष्ट्रीयअध्यक्ष श्री लालबाबु गुप्ता यांच्या मार्गदर्शक खाली आज अम्बुलंस मोफत सेवा नागरिकांसाठी उपलब्ध केली आहे त्या साठी मो. 9168686500 या नंबर वर संपर्क साधुन लाभ घेऊ शकता असे संगठनचे गुप्ता यांनी सांगितले .