व्हीएसआरएस न्युज प्रतिनिधी (अक्रमशेख) पिंपरी- व्हीएसआरएस ’नं हाक द्यावी अन् पिंपरी-चिंचवड करांनीही या हाकेला ओ देत भरभरून प्रतिसाद द्यावा, हीच आजपर्यंतची परंपरा. यंदाही ‘व्हीएसआरएस’च्या तिसराव्या वर्धापन दिनाच्या ‘पिंपरी चिंचवड कर ’ विशेषांकाला पिंपरी-चिंचवड करांचं उत्कट प्रेम लाभलं. याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण एकत्र येणारच ना! अर्थात निमित्त आहे ‘व्हीएसआरएस’च्या स्नेहमेळाव्याचं. जिल्ह्यातील समाजमनाचा आरसा’ असा लौकिक प्राप्त केलेल्या ‘व्हीएसआरएस’च्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीचा तिसरावा वर्धापनदिन मंगलवार, दि. १0 रोजी साने चौकातील मुख्य कार्यलय येथे दिवसभर 11 ते 06 या वेळेत कोरोना मुळे आॕफीस मध्ये साजरा होणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील प्रत्येक विधायक प्रयत्नाचा सन्मान करीत, विजिगीषू वृत्तीच्या प्रत्येक यशस्वी पिंपरी-चिंचवड कराच्या नावाचा उद््घोष करीत आणि प्रत्येक विघातक शक्तीवर कठोर प्रहार करीत ‘व्हीएसआरएस’ची पिंपरी-चिंचवड आवृत्ती तिसराराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. जिल्ह्याची परिपूर्णतेकडे वाटचाल व्हावी, हा हेतू ठेवून ‘व्हीएसआरएस’ने मावळत्या वर्षातही अनेक उपक्रम राबविले. केवळ बातमी देऊन न थांबता बातमीमागची बातमी शोधण्याचा प्रयत्न करून अचूक विश्लेषण पिंपरी-चिंचवड करांसमोर ठेवले. ही विश्लेषणे, भाकिते आणि ठोकताळे अचूक ठरल्याने ‘व्हीएसआरएस ’वरील वाचकांचे प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत झाला आहे. या शिदोरीच्या जोरावर तिसराराव्या वर्षात अधिक जोमाने काम करण्यास ‘टीम व्हीएसआरएस ’ सज्ज झाली आहे.या वर्षी व्हीएसआरएस मराठी न्युज द्वारा नागरिकांना आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आज मराठी न्युजचा उद्घाटण होणार असुन आपला आशीर्वाद साठी उपस्थित राहावे..
व्हीएसआरएस न्युज मुख्य संपादक श्री लालबाबु गुप्ता यांनी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण एकत्र या अर्थात निमित्त आहे ‘व्हीएसआरएस’च्या स्नेहमेळाव्याचं..