व्हीएसआरएस न्युज पिंपरी- शहरामध्ये आज नवीन 750 करोनाबाधितांची नोंद.
तर करोनातून 1520 रुग्ण बरे झाले आहेत. दिवसभरामध्ये 46 करोनबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवारी (दि. 21) शहरात 750 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 45 हजार 413 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 45 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 30 व शहराबाहेरील 15 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील व शहराबाहेरील 5798 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरामध्ये 1520 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 29 हजार 18 इतकी झाली आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 4509 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 8052 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 12 हजार 516 इतकी आहे.