व्हीएसआरएस न्युज -दक्षता जागृती सप्ताहानिमित्त महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. अरुण आंधळे साहेब यांनी प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.संजय नगरकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख सुशीलकुमार गुजर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. अतुल चौरे तसेच सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे येथे केंद्र व राज्य शासन यांनी सांगितल्याप्रमाणे दिनांक 27 ऑक्टोबर 2020 ते 02 नोव्हेंबर 2020 या कालावधीत “दक्षता जागृती सप्ताहाचे” आयोजन करण्यात आले होते. ‘सतर्क भारत – समृद्ध भारत’ ही संकल्पना घेऊन या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत शासनाने निर्देशित केल्यानुसार दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर माननीय राज्यपाल व माननीय मुख्यमंत्री यांनी या सप्ताहनिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखवण्यात आला.
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने उपक्रमाला उत्स्फूर्त सहभाग घेतला.