व्हीएसआरएस न्युज -राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर नवरात्र उत्सवानिमित्त महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघालेल्या आय.ए.एस च्या 60 सायकलस्वार पैकी निलेश शिलावणे यांचे कराडजवळ सायकल चालवताना नुकतेच अपघाती निधन झाले होते. त्यांच्या अपघाती निधनाने आयएएसला श्रद्धांजली राईड आयोजित केली होती. सायकलस्वार व धावपटूंना सुरक्षेसाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि इतर सर्व वाहनांनी सुद्धा सर्व सायकलस्वारांना व धावपटूंना आदर व प्राधान्य द्यावे या अनुषंगाने या राईड चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रविवारी सकाळी विजयादशमीच्या निमित्ताने पुणे व पिंपरी चिंचवड येथील 150 पेक्षा जास्त सायकल स्वर कात्रज येथे सकाळी आठ वाजता जमले.
शहरातल्या दोनशे सायकली स्वरांनी व विविध संस्थांनी यामध्ये सहभाग घेतला. सर्वप्रथम निलेशला जागेवर उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यानंतर रोडच्या दोन्ही बाजूला फलक दाखवून सायकलस्वारांचा आदर करा ते एकप्रकारे पर्यावरण रक्षण करत असतात. फिटनेससाठी लोक रनिंग करत असतात आणि चालणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन बाकीच्या स्वयंचलित वाहनांनी त्यांचा आदर करावा, हा यामागचा उद्देश होता.
प्रबोधन रॅलीचा सायकल मार्ग बाणेर -चांदणी चौक -वारजे -कात्रज टनेल असा होता.
सायकलिंग व रनिंग यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी सरकारने देखील त्यादृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये चेंज करणे गरजेचे आहे. त्या संदर्भात योग्य ती निवेदन देऊन जनजागृती देखील करण्यात येईल, असे इंडो अथलेतिक सोसायटी तर्फे सांगण्यात आले.