व्हीएसआरएस न्युज पिंपरी- आकुर्डी:प्रतिनिधी
आझमभाई पानसरे युवा मंच व सिध्दार्थ नवराञ महोत्सव मिञ मंडळ याच्या वतीने स्वीकृत नगरसेवक सुनिल कदम यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महापालिका कामगारांना परिसरातील कचरा गोळा करण्यासाठी डस्ट बिन चे देखील वाटप करण्यात आले.
अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे, नगरसेविका तथा माजी उपमहापौर शैलेजाताई मोरे यांच्या वतीने महापालिका कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते असे आयोजकांकडून सांगण्यात आले.