व्हीएसआरएस मराठी देहु-अनधिकृत बांधकामाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांनी करू नये,सचिन काळभोर यांनी मागणी केली आहे.
जगद्गगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या देह येथील शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ जूनला होणार आहे. शिळा मंदिराचे बांधकाम संरक्षण विभागाच्या रेड झोन या प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्याने ते नियमानुसार अनधिकृत बांधकाम आहे. त्यामुळे त्या उद्घाटनास भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी विरोध दर्शविला आहे.
अनधिकृत बांधकामाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांनी करू नये, अशी मागणी आहे. त्यांनी मंदिराचे लोकार्पण केल्यास रेड झोनमधील हजारो अनधिकृत बांधकामांना एक प्रकारे प्रोत्साहन दिल्याचा चुकीचा संदेश नागरिकांमध्ये जाईल.
अनधिकृत बांधकामाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांनी करू नये, अशी मागणी आहे. त्यांनी मंदिराचे लोकार्पण केल्यास रेड झोनमधील हजारो अनधिकृत बांधकामांना एक प्रकारे प्रोत्साहन दिल्याचा चुकीचा संदेश नागरिकांमध्ये जाईल.
शिळा मंदिराला विरोध नाही फक्त रेड झोन एरिया कमी करण्यात यावा.रेड झोन क्षेत्र कमी करुन समाविष्ट गावे वगळण्यात यावी,नंतर शिळा मंदिर उद्घाटन करण्यात यावे,गेल्या कित्येक वर्षांपासून रेड झोन एरिया कमी करावा म्हणून आंदोलन करण्यात आले निवेदन देण्यात आले संरक्षण क्षेत्रातील बाधित गावांना न्याय मिळावा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या कडे अपेक्षा आहे असे नमुद केले आहे.
त्यासंदर्भात काळभोर यांनी
पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोमवारी (दि.२३) तक्रार केली आहे. काळभोर म्हणाले की, शिळा मंदिरास आमचा विरोध नाही. मात्र, रेड झोन क्षेत्रात ते मंदिर उभारण्यात आले आहे.
देहूमधील शिळा मंदिर ४२ फूट उंचीच असून मंदिरातील तुकोबांची मूर्ती ४२ इंचाची आहे. ही मूर्ती ४२ दिवसात साकारण्यात आली.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतील शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. हे शिळा मंदिर कसं आहे? अशी उत्सुकता अनेकांना लागली आहे.
मंदिरावर नक्षीकाम करण्यात आलं आहे, त्यात मोर, हत्ती यांचे कोरीव नक्षीकाम करण्यात आलं आहे.
नक्षीकाम सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.देहू संस्थानचे नितीन महाराज मोरे म्हणाले, “जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगगाथा तरल्या गेल्या, त्या कालावधीत तुकाराम महाराज १३ दिवस अन्न, पाणी सोडून अनुष्ठानसाठी बसले होते.”
भगवंताच्या कृपेने अभंगगाथा दगडासह वर आल्या आणि तुकोबारायांनी अनुष्ठान सोडलं. परंतु, तुकोबारायांचे चरण स्पर्श झालेल, ज्या शिळेवर ते बसले होते. ती शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तुकोबांचे चिरंजीव तपोवन महाराज यांनी देहूच्या मंदिरात आणून ठेवली होती,” असं नितीन महाराज मोरे यांनी सांगितलं.
भाविक, वारकरी दर्शन घेत होते. त्या शिळेवर भव्यदिव्य मंदिर असावं असा वारकरी संप्रदायाचा आग्रह होता. ते देहू संस्थान पूर्ण करत आहे याचा आनंद होतो आहे, अशीही भावना मोरे यांनी व्यक्त केली.
२००८ साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं होतं. प्रत्यक्षात २०१५-१६ साली शिळा मंदिराचं काम सुरू झालं.
Discussion about this post