Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉक्टरला काल दि. ०३ मार्च रोजी रात्री मारहाण झाली होती. या प्रकरणी मारहाण करणार्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या घटनेचा निषेध करत रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. त्यामुळे रुग्णसेवा कोलमडली आहे.
काल रात्री मोशीतील नॉरमन लायरस आरलेन (वय 48) आणि शरवीन नॉरमन आरलेन (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नॉरमन याच्या तीन मुलींना घेऊन ते वायसीएम रुग्णालयात आले होते. या मुलींना मारहाण झाली होती. त्यापैकी एकीचा सीटी स्कॅन करणे आवश्यक वाटल्याने तेथे इमर्जन्सी वॉर्डमध्ये असलेले डॉक्टर नरेश शिवानंद अंजनादेवी (वय 25) यांनी त्यांना तसा सल्ला दिला. मात्र, आरोपींनी सीटी स्कॅन करण्यस नकार दिला. तातडीने एमएलसी पेपर्स द्या आणि जखमांचे स्वरुप वाढवून लिहून द्या असे सांगत गोंधळ घालून डॉक्टर नरेश आणि डॉक्टर अथर्व यांना धक्काबुक्की, मारहाण व शिवीगाळ केली. माझी आमदाराशी ओळख आहे. उद्या तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. मात्र, या घटनेचा निषेध करण्यासाठी आज निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे.
Discussion about this post