व्हीएसआरएस मराठी न्युज –पुणे शहराचा पारा शनिवारी राज्यात सर्वांत नीचांकी ठरला. शहराचा पारा 11.9 अंशापर्यंत खाली आला होता.
शनिवारचे राज्याचे तापमान..
पुणे 11.9,नगर 12.5,कोल्हापूर 17, महाबळेश्वर 15, नाशिक 14.2, सांगली 15, सातारा 12.4, सोलापूर 16.7, छत्रपती संभाजीनगर 14.4, परभणी 15.4, नांदेड 15.2, अकोला 16.3, अमरावती 15, चंद्रपूर 14, गोंदिया 12.6, नागपूर 14.8, वर्धा 14.6
महाराष्ट्रात 3 ते 5 जानेवारी या काळात कोकणात तर 5 जानेवारी रोजी मध्यमहाराष्ट्राला हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतात अजूनही पश्चिमी चक्रवात सक्रीय असून त्या भागात दाट धुके अन् कडाक्याची थंडी आहे. तसेच 1 ते 5 जानेवारी या कालावधीत या सर्व भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात पावसाने होत आहे.
Discussion about this post