व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –नववर्षाच्या स्वागतार्थ बरेच नागरिक घराबाहेर पडून मध्यरात्री पर्यंत पार्ट्यांचे आयोजन करत असतात. बऱ्याचदा नागरिक नशा करुन वाहन चालवून हुल्लडबाजी करतात. अशांवर पिंपरी-चिंचवड पोलीस करडी नजर ठेवून कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून शहरात ३० ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.
नाकाबंदीच्या ठिकाणी प्रत्येक वाहनचालकाची कसून चौकशी करण्यात येणार असून ब्रेथ ॲनालायझर मशीनच्या सहाय्याने श्वासाचे नमुने तपासण्यात येणार आहेत. दारु पिवून वाहन चालवणाऱ्या प्रत्येक वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यांचे वाहन अटकावून ठेवण्यात येणार आहे. तरी कोणीही नशा करुन अथवा धोकादायकरीत्या वाहन चालवू नये.
Discussion about this post