नेदरलँड । व्हीएसआरएस न्यूज ।
नेदरलँडला ‘युनिस’ चक्रीवादळाच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर देशाकडून अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. डच एअरलाइन केएलएम (KLM) नं दिलेल्या माहितीनुसार, वादळामुळे शुक्रवारी १६७ नियोजित उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. एअरलाइन कंपनीनं जाहीर केलेल्या एका निवेदनानुसार, गुरुवारी १७ फेब्रुवारी आणि शुक्रवार १८ फेब्रुवारी २०२२ रोजी अॅमस्टरडॅममधील वादळी हवामानामुळे, अॅमस्टरडॅम विमानतळ ‘शिफोल’वरून होणाऱ्या उड्डाणांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे १६७ उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
गुरुवारी नेदरलँड्सच्या हवामान सेवेनं युनिस चक्रीवादळाच्या संदर्भात एक इशारा जारी केला होता. युनिस चक्रीवादळ देशाला शुक्रवारी धडकण्याची शक्यता आहे.
Discussion about this post