व्हीएसआरएस न्युज पिंपरी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका सौ. सुलक्षणा शीलवंत यांच्या वतीने वाय सी एम हॉस्पिटलमध्ये अपंगांसाठी व्हील चेअर आणि दोन अम्ब्युलन्स देण्यात आल्या.
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी माझ्यासह, विरोधीपक्ष नेते श्री राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते श्री नाना काटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा वैशालीताई काळभोर, माजी नगरसेवक मोहम्मदभाई पानसरे, नगरसेविका माई काटे, पक्ष प्रवक्ते फझल शेख, नगरसेविका प्रज्ञा खानविलकर, जगदीश शेट्टी, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक अतुल शितोळे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप व इतर मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post