व्हीएसआरएस न्युज आकुर्डी व्यापारी संगठन अध्यक्ष अजित शितोळे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधुन आज दि.२७ आकुर्डी येथे 300 गरजु नागरिक विद्यार्थी यांना पुस्तक वाटप करण्यात आले.
राजर्षी शाहू महाराज म्हणजे निमित्ताने बहुजन समाजाला सोबत घेवून जाणारा महानायक,आरक्षणाचे जनक,बालकांच्या शिक्षणाचा मुलभूत हक्क शंभर वर्षापूर्वीच ज्यांनी जोपासला अशा दुरदृष्टी महानायकाच्या जीवनप्रवासातील ध्येय धोरणांशी प्रेरीत होवून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
राजर्षी शाहू महाराजांचे विचार तथा कर्तृत्त्व सामान्य जणांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने अजित शितोळे व आपुलकी ज्येष्ठ नागरिक संगठन यांच्या वतिने पुस्तके प्रती 2 डरजन वाढदिवसाच्या खर्चातून बचत केलेल्या रकमेतून खरेदी करून वाटप केल्या.
सदर कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. महापुरुषांचे विचार आणि सामाजिक कार्य नवीन पिढी पर्यंत पोहचवणेसाठी असे उपक्रम राबवले गेले पाहिजेत, असे मत नागरिकांतून मांडले जात आहे.
सदर कार्यक्रम मध्ये मा नगरसेवक अप्पा बागल, फैमिदा शेख, आपुलिक जेष्ठ नागरिक संघ चे आण्णा कुर्हाडे, ज्ञानेश्वर ननावरे, रमेश बनसोडे,सुभाष चौधरी, संपत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
अतुल शितोळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
Discussion about this post