व्हीएसआरएस न्युज दिल्ली -जम्मूमधील विमानतळावर मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. आज (२७ जून) सकाळी तांत्रिक विभागात हा स्फोट झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट भारतीय हवाई दलाकडून पूर्ण कामकाज चालवत असलेल्या भागात झाला आहे.
स्फोट झाल्याची माहिती मिळताच बॉम्ब निकामी करणारं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. या स्फोटाची माहिती मिळताच पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
भारतीय हवाई दलाकडून चालवल्या जाणाऱ्या सतवारी हवाई दल स्टेशनवर हा स्फोट झाला आहे. साधारण पहाटे २ वाजता हा स्फोट झाला आहे. मात्र हा स्फोट किती मोठा होता याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Discussion about this post