व्हीएसआरएस मराठी न्युज –एमआयएमचं पहिल राष्ट्रीय अधिवेशन दोन दिवस नवी मुंबईत होत आहे. अधिवेशनाला आमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्यासह देशातील महत्वाचे नेते हजेरी लावणार आहेत.
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ओवेसी पक्षातील पदाघधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.
सकाळी 9.30 वाजता असदुद्दीन ओवेसी यांची रामाडा हॉटेल इथं पत्रकार परिषद होईल. सायंकाळी 7 वाजता मुंब्र्यात भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून ओवेसी लोकांशी संवाद साधणार आहेत.
Discussion about this post