व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 1 हजार 694 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 32 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 932 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 41 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 853 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.
शहरामध्ये सध्या 187 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 37 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 150 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी (दि.8) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात आले आहे.तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 3,951 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 34 लाख 46 हजार 934 जणांना लस देण्यात आली आहे.
Discussion about this post