व्हीएसआरएस मराठी न्युज -पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ एप्रिलला देशवासियांना लाल किल्ल्यावरुन संबोधणार आहेत. गुरु तेग बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाश पर्व निमित्ताने देशाला संबोधित करणार आहेत.
दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने सांस्कृतिक मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
यावेळेस मोदी जगभरातील सिख समुदायाला महत्त्वाचा संदेश देऊ शकतात. पंतप्रधान या दिवशी एक स्मारकाच्या नाण्याचं आणि टपाल तिकीटही जारी करतील, अशी माहिती सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात आली. या कार्यक्रमात ४०० सिख संगीतकार हे शबद कीर्तनाचं गायण करणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्रालयांनी दिली.
शीख गुरू तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि देशातील आणि जगातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.
Discussion about this post