व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहरासाठी एक कोअर कमिटी स्थापन केली.
महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या समितीने सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार व काँग्रेसने केलेली कामे जनआंदोलनाद्वारे मतदारांसमोर आणण्यासाठी काम करायचे आहे.
समितीची नावे निश्चित करण्यात आली. त्यात श्रीमती वर्षाताई गायकवाड,अध्यक्ष मुख्य समन्वयक मंत्री, महाराष्ट्र राज्य आहे.
श्री. संजय राठोड, उपाध्यक्ष, म.प्र. कॉ.क. तथा प्रभारी पिंपरी चिंचवड श.जि.काँ.क.
श्री. कैलास कदम, अध्यक्ष पिंपरी चिंचवड श. जि.काँ.क.सदस्य
श्री. पृथ्वीराज साठे, सचिव, अ. भा. काँ.क.सदस्य
श्री. सचिन साठे,सचिव, म.प्र.काँ.क.सदस्य
श्री. दिलीप पांढरकर,सदस्य
वरिष्ठ उपाध्यक्ष, पिपरी चिंचवड श. जि.कॉ.क. श्री. अनिरूध्द कांबळे,सदस्य
वरिष्ठ उपाध्यक्ष, पिंपरी चिंचवड श. जि.काँ. क..
ही समिती १३जून सकाळी जाहीर करण्यात आली.
प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत पक्ष बांधणीची तयारी करणे, शहर विकासाचा मास्टर प्लॅन तयार करणे, शहरातील समस्या व प्रश्नांची तसेच महानगरपालिकेत सत्ताधारी पक्षाने केलेल्या गैरकारभाराची माहिती जनआंदोलनाद्वारे उघड करणे, काँग्रेस पक्षाने केलेल्या विकास कामांची यादी तयार करून जनतेसमोर ठेवणे आणि निवडणुकी करिता इच्छुक उमेदवारांचे पॅनल तयार करणे इत्यादी कामांकरीता खालील प्रमाणे कोअर कमिटी नियुक्त करण्यात आलेली आहे.
Discussion about this post