व्हीएसआरएस मराठी न्युज दिल्ली -आज ईडी कार्यालयात सोनिया गांधी यांच्या चौकशीबाबत काँग्रेस नेत्यांनी रणनीती तयार केली आहे. काँग्रेस पक्ष आज देशव्यापी आंदोलन करणार आहे.
नॅशनल हेराल्ड’शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज 21 जुलै रोजी ईडीसमोर हजर होणार आहेत. यापूर्वी ईडीने राहुल गांधींची पाच दिवस चौकशी केली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे की, “आमच्या सर्वोच्च नेतृत्वाविरुद्ध मोदी-शाह जोडीकडून ज्या पद्धतीने राजकीय सूडबुद्धी सुरू आहे, त्याविरोधात काँग्रेस पक्ष उद्या आपल्या नेत्या सोनिया गांधींसोबत सामूहिक एकता व्यक्त करत देशभरात निषेध व्यक्त करेल.”
Discussion about this post