व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी –कोकणातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे.नोकरी उद्योगाच्या निमित्ताने मोठ्या शहरात असलेले कोकणातील रहिवासी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या मूळ गावी जात असतात.
कोकणात उत्साहात साजरी करणारे प्रमुख दोन सण त्यामधील प्रमुख एक म्हणजे *गणेश चतुर्थी* या सणामुळे प्रत्येक कोकणामधील माणसाच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह ओसंडून व्हायला लागतो. गणरायाच्या आगमना बरोबर सुरू होणारा हा सण कोकणी माणूस सुद्धा सह कुटुंब सहपरिवरासोबत मोठ्या जल्लोषात साजरा करीत असतो.
पिंपरी चिंचवड परिसरामधील कोकणवासी बांधवांना गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी जाण्यासाठी निगडी येथून तब्बल ८ ते १० बसेस विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दरवर्षी नियोजन करणारे अध्यक्ष श्री. दादा हटले , जयेश थुवड, चव्हाण साहेब,अजय पाताडे, महेश देसाई, साळसकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी छान व्यवस्था केली. यावेळी श्री कैलासभाऊंचे सुद्धा कोकण वासीयांनी मोठ्या आनंदाने स्वागत केले. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी श्री.कैलास कुटेयांच्या हस्ते प्रत्येक बस चालकास मिठाई देण्यात आले.
यावेळी “गणपती बाप्पा मोरया” असा मोठ्या जयघोषात करीत हा परिसर मात्र भक्तिमय झाला होता. निगडी येथून जाणाऱ्या कोकण वासीयांना श्री.कैलास भाऊ कुटे यांनी पुढील प्रवास हा सुखमय,आनंदमय आणि आरोग्यदायी जाओ यासाठी मनापासून शुभेच्छा देत निगडी मधून कोकणाकडे सोडण्यात आल्या.
सध्या गणपतीसाठी गावी जाण्याची सर्वांची लगबग सुरु आहे, पण रेल्वेची सर्व तिकिच आधीच बुक असल्यामुळं एसटी किंवा खासगी बसने मुंबईतील चाकरमान्यांना गावी जावे लागत आहे, पण सणासुदीच्या काळात खासगी बस ट्रव्हल्सवाल्याकडून प्रवाशांची लूट सुरु आहे. एरवी 500 किलोमीटर प्रवासासाठी 600 ते 800 रुपये एवढे तिकिट आकारले जायचे पण आता 1000 ते 1200 रुपये एवढे तिकिट घेतले जात आहे, त्यामुळं प्रवाशांच्या संतप्त भावना असून, सणासुदीच्या काळात गावी जाण्यास दुसरा पर्याय नसल्यानं आपल्याकडून खासगी ट्रव्हल्सवाले अव्वाच्या सव्वा तिकिटाचे पैस घेत असून, प्रवाशांकडून लूट सुरु आहे, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.
एकिकडे गणपतीला गावी जाण्यासाठी खासगी ट्रव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची लूट सुरु असताना, दुसरीकडे समाजसेवक कैलास कुटे यांच्या रुपाने माणुसकिचे दर्शन सुद्धा होत आहे, त्यामुळं या बसमधून गेलेल्या प्रवशांनी आनंद व्यक्त केला असून, समाजसेवक कैलास कुटे यांचे आभार मानले आहेत, व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Discussion about this post